दुबई येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ राज्य महोत्सवाचा रोजी सायंकाळी ६ वाजता स्विस इंटरनॅशनल ऑडिटोरियम, दुबई येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी, धनगरी व कोळी नृत्य, जागरण-गोंधळ आदी पारंपरिक लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील विविधता, परंपरा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय दुबईतील रसिकांना करून देण्यात येणार असून, परदेशातील नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दुबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

ganpatinews