शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ शामनगर जोगेश्वरी पुर्व मुंबई या मंडळाकडून स्वच्छता दूतांच्या हस्ते महाआरती

शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ शामनगर जोगेश्वरी पुर्व मुंबई या मंडळाकडून स्वच्छता दूतांच्या हस्ते महाआरती

‘कचरावाला’ नव्हे, ‘स्वच्छता दूत’ म्हणा!
 शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ शामनगर जोगेश्वरी पुर्व मुंबई या मंडळाकडून स्वच्छता दूतांच्या हस्ते महाआरती

मुंबई : शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त काल सायंकाळी ७.३० वाजता विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या के-नॉर्थ विभागातील कचरा वेचकांना ‘कचरावाला’ न संबोधता ‘स्वच्छता दूत’ म्हणून सन्मान द्यावा, असा जनजागृतीपर संदेश देत त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता दूतांच्या योगदानाचा गौरव करत मंडळाने त्यांना आरतीचा मान दिला. सामाजिक सन्मान आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड, निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दशरथ मोरे ,खजिनदार श्री मितेश साळवी, सेक्रेटरी सुदेश धुरी व  उत्सवसमिती अध्यक्ष श्री शिवाजी खैरनार यांनी ही भावना बोलून दाखवली. 
ही आरती करिता भारतीय जनता पक्षाचे जोगेश्वरी विधानसभेचे पदाधिकारी तसेच वार्ड क्रमांक 73 व 74 चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने स्वागत व आभार मानले .