नवश्या गणपती मित्रमंडळातर्फे नऊ फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

खामखेडा : वाताहिर सह्याद्रीची पर्वतरांग असलेल्या खामखेडा गावातील पवित्र पावन नवसाला पावणारा श्री सिद्धिविनायक नवश्या गणपती मंदिराच्या प्रांगणात नवश्या गणपती मित्रमंडळातर्फे भव्यदिव्य अशी सुंदर नऊ फुटांची मूर्ती बाप्पाच्या आगमनानिमित्त बसविण्यात आली. मंदिरात सजावट, रोषणाई आणि भाविकांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवश्या गणपती मित्रमंडळातर्फे यंदाही भव्य मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी गावातील मान्यवर, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

नवश्या गणपती मित्रमंडळातर्फे नऊ फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना