सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘येवा येवा शिरी गनेस देवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘येवा येवा शिरी गनेस देवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतील #लोकपरंपरा, #लोककला आणि सांस्कृतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या #सांस्कृतिककार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘येवा येवा शिरी गनेस देवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. मालवणी मुलुखातील गणेशोत्सवाची गीत, संगीत आणि पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून अनुभूती या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. गीत रचना व संहिता महेश केळुसकर, संगीत मिथिलेश पाटणकर आणि अभिसंवाद सुप्रिया विनोद मंगेश सातपुते यांचे आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून गावचे भजन सादर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.